पुरोगामी क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकार्यांची धुळ्यात बैठक
धुळे- पुरोगामी क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक येथील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात नुकतीच झाली. देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणार्या संस्था, संघटनांच्या प्रतिनिधीशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार जयदेव गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती अॅड. जे. टी. देसले बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, रणजित राजेभोसले यांच्यासह रामदास जगताप, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, गो. पि. लांडगे, प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अॅड. विशाल साळवे, अॅड. राहुल वाघ, शकील अन्सारी, हेमंत भडक, दीपक देवरे, जोसेफ मलबारी, जितेंद्र सोनवणे, अमरदीप पवार, आकाश मोरे, सुनील लोंढे, अॅड. जुबेर शेख, सचिन सोनवणे आदींसह धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार जयदेव गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे, अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, रामदास जगताप आदींनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
—————–