अमळनेर पोलिसांची टवाळखोर रोड रोमीयांवर कारवाई
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात कॉलेज परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीचा मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी गांभीर्य पूर्वक विचार करत शहरातील प्रताप महाविद्यालय व धनदाई कॉलेज परिसरात कारवाई करण्याचे नियोजन केले. वर नमूद दोन्ही महाविद्यालय परिसरात दोन वेगवेगळे पथके तयार करून पथकांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले..
नमूद दोन्ही पथकांनी दोन्ही महाविद्यालयीन परिसरात एकूण ०८ रोडरोमियोना हेरून त्यांच्याकडून महाविद्यालयीन ओळखपत्राची मागणी केली व परिसरात फिरण्याचा/थांबण्याचा उद्देश विचारला परंतु त्यांच्याकडेस ओळखपत्र नसल्याने व उडवाउडविची उत्तर देत असल्याने परिसरात/थांबण्याचे सबळ कारण नसल्याने वरील एकूण ०८ मुलांना रोमिओगिरी करताना तसेच सार्वजनिक शांततेच्या भंग करून आरडा ओरड करताना मिळून आल्याने त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक श्री विकास देवरे साहेबांनी दिलेली आहे.
सदरची कारवाई मा.श्री. सुनील नंदवाडकर सो.,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाने पोहेका/गणेश पाटील, पोहेका/मिलिंद सोनार, पोहेका/रवींद्र पाटील, पोना/सिद्धांत सिसोदे, पोना/मिलिंद बोरसे, पोका/निलेश मोरे, पोना/संजय बोरसे, पोका/जितेंद्र निकुंभे, पोका/अमोल पाटील, पोका/विनोद संदानशिव, पोका/गणेश पाटील, पोका/विनोद पाटील अशांच्या पथकाने केली आहे..