• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Aug 7, 2024

Loading

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व सेंट अलाॅयसेस स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन महेशजी वाघमोडे मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्या हस्ते यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या चाल चालुन उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी सेंट अलाॅयसेस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर सलमा ,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका समन्वयक डॉ‌ प्रदीप साखरे ‌, तांत्रिक समिती सदस्य मेघाश्याम शिंदे, प्रा. मनोज वारके, आर. आर.धनगर वंदना ठोके, यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते. उद्घाटन पर भाषणामध्ये महेश वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळांना महत्व दिले पाहिजे खेळामुळे आपला शारीरिक मानसिक व सर्वांगीण विकास होत खेळामुळे आपल्याला पाच टक्के आरक्षणामध्ये क्लासवन अधिकारी होता येते. खेळामध्ये आपल्याला करिअर सुद्धा करता येते आत्ताच ऑलम्पिक स्पर्धा सुरू आहे यात भारताला शूटिंग मध्ये मेडल प्राप्त झालेले आहे. क्रीडा स्पर्धां सहभागा मुळें स्वतःचे नाव तर उज्वल करता येते परंतु देशाचे नाव सुद्धा आपल्याला ऊंच करता येते. त्यामुळे खेळ हा सांघिक भावनेने खेळा. भुसावळ तालुका बुद्धिबळ स्पर्धा निकाल खालील १४ वर्ष वयोगट त्यात 1)सोहम चौधरी सेंट अलोयसिस स्कूल २) संगम रीतापुरे. वर्ड स्कूल ३) धारव तायडे वर्ड स्कूल ४) यज्ञेश पाटील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळ. ५). युग कोटे च्या सेंट अलोयसिस स्कूल तसेच १७ वर्ष वयोगट त्यात १)आर्यन सूर्यवंशी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळ
२) अमित झनके ताप्ती पब्लिक स्कूल ३) मानव पाटील के नारखेडे ४) अभिनव कोटुर्वल के नारखेडे ५) आदित्य माळी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळ
तसेच १९ वर्ष वयोगट त्यात १) दानिश तडवी के नारखेडे
२) वृशिकेश नेमाडे नाहटा कॉलेज ३) अथर्व भारंबे नाहटा कॉलेज ४) साद शेख अस्लम शेख बी झेड स्कूल ५) भार्गव भामरे के नारखेडे
हे विजयी झालेपंच म्हणून प्रवीण ठाकरे ,मिलिंद शिरोडे यांनी काम पाहिले यांनी. स्पर्धेसाठी तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉ. प्रदीप साखरे, तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे , प्रा. मनोज वारके यांनी काम बघितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी, कोळी, निलेश नेहते,
अलेस्टर सिमोन ,अजय डोळे, बॉबी पवार ,सुमित दास गुप्ता अदर शेख यशस्वीतेसाठी, कोळी सर, याकुब शेख, यांच्यासह सेंट अलाॅयसेस स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *