प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही-धनगर समाजाचे नेते सुनिल बापू वाघ यांचे प्रतिपादन
धनगर समाज गुणवंत कर्मचारी मंच आयोजित,गुणगौरव समारंभांत सुनिल वाघ यांचे आवाहन
शिरपुर- स्वत:बरोबरच समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, भरपूर शिका, खेळा, उत्तुंग झेप घेऊन कुटुंबाचे, समाजाचे नाव उज्वल करा, समाज आपल्या पाठीशी उभा राहील. असे प्रतिपादन दि. 25 ऑगस्ट रोजी शिरपुर अहिल्या लॉन्स येथे होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा धनगर समाज कर्मचारी मंचतर्फे आयोजित गुणगौरव समारंभात धनगर समाजाचे नेते सुनिल बापू वाघ यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे ज्येष्ठ नेते सर्वश्री. अण्णासाहेब उखा बंडु ठाकरे,सुतगिरणीचे संचालक सुदामतात्या नथ्थू भलकार, ह.भ.प. गोरख पाटील, अमळनेरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी.ए. धनगर सर , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव कैलास बोरसे, सेवानिवृत्त पीआय रमेश रत्नपारखी सर,संजय धनगर, दिलीप धनगर, सुनील भलकार,मनोज धनगर, निंबा धनगर, डॉ.सचिन सूर्यवंशी, कुरखळीच्या सरपंच सुचित्रा धनगर,मंगला धनगर, पांडुरंग धनगर, तऱ्हाडी ग्रामपंचायत माजी सदस्य किरण भलकार, वसंत बिलाडे उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी राजू आढावे,व रतिलाल पाकळे यांचा व पदोन्नती कर्मचाऱी कैलास कंखरे यांचा सत्कारही करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष भलकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज कर्मचारी मंचचे अध्यक्ष रामचंद्रआप्पा ठाकरे, सदस्य मुकुंदा पाकळे, दिलीप पाकळे, रतिलाल पाकळे, सि टी धनगर सर, अरुण सोनवणे, देविदास निळे, रामचंद्र भलकार, सुभाष भलकार,सुरेश आढगाळे,प्रा. उदय भलकार, प्रेम राज हिवराळे, संदीप झटकर, समाधान धनगर , विशाल भलकार, मुकेश आढावे, निलेश आढावे, रवी धनगर, ज्ञानेश्वर धनगर, ब्रिजलालधनगर, भूषण पेंढारकर, भास्कर धनगर, मुकेश बिलाडे, नंदलाल भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश धनगर प्रा.सतीश निळे, गांगेश्वर धनगर यांनी केले, आभार प्रदर्शन ज्येष्ठ सदस्य ज्ञानेश्वर हडप सर यांनी केले.