जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथे शालेय विद्यार्थींनी समुपदेशन कार्यशाळा संपन्न
चांदा (प्रतिनिधी/प्रा. रावसाहेब राशिनकर)
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा येथे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत शालेय विद्यार्थिनी समुपदेशन कार्यशाळा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.अर्चना निराळे उपस्थित होत्या. कार्यशाळेत समुपदेशक म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.विनया राजगुरू यांनी मुलींच्या सर्वांगीण विषयाला स्पर्श करत त्यांच्या आरोग्य, शिक्षण,संस्कार आणि सामाजिक वर्तन या बाबतीत विद्यार्थिनी सोबत चर्चा केली.सद्य स्थितीत मुलीनी कसे जागरूक असावे…. सोशल मीडीयापासून कसे वाचले पाहिजे ते हि सोदाहरण समजाऊन सांगितले.त्याबरोबरच आपले वर्तन कसे असावे, आपल्या समस्या आपण आपल्या आई सोबत किंवा शिक्षिका सोबत कायम शेअर केल्या पाहिजेत आपले कायदेशीर हक्क यांची जाणीव ही करून दिली पण त्यासोबतच आपण समाजात वावरताना कोणती खबरदारी घ्यावी हेही संगितले.आपल्या आरोग्य संबधीत ज्या समस्या असतील त्या निर्भिड पणे आपल्या शिक्षिकांना विचारायला हव्यात,आपले शिक्षण, ध्येयपूर्ती यासाठी आपण प्रयत्न करावेत. स्पर्शज्ञान (good touch..bad touch) याची सविस्तर माहिती दिली.या नंतर सहशिक्षिका व कार्यशाळेच्या सह समुपदेशक श्रीम.स्वाती दळवी यांनी केरळ मधील काही घटना प्रस्तुत केल्या. विश्वास नांगरे पाटील यांचा सद्य स्थितीतील एक लेख सांगून मुलींना जागरूक केले . विद्यालयाचे प्राचार्य श्री.हरिभाऊ जावळे सर यांनीही मुलींना सद्य स्थिती बाबत मार्गदर्शन केले आणि एक सक्षम भावी प्रगतीशिल नागरिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.अर्चना निराळे यांनीही मुलींना मार्गदर्शन केले.एकूणच हा कार्यक्रम मुलींना एक वेगळी आशा आणि दिशा देणारा ठरला.विद्यालयातील अध्यापिका श्रीम.वैशाली गडाख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रीम.रुख्मिणी सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.