प्रताप महाविद्यालयातील तिघांची छात्रसैनिक पोलीस दलात निवड
————————————————
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे तीन माजी छत्रसैनिक महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. प्रस्तुत विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष 2019 ते 2022 या कालावधीत एनसीसी सक्रिय छात्रसैनिक होते,तसेच ते भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी देखील होते. पोलीस दलात भरती झालेले तिघे अमळगाव गावचे रहिवासी आहेत.
*पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी*
१) निलेश बुधा कुंभार,
२) जयवंत संजय कुंभार
३) सौरभ गुलाबराव कोळी.
दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचा पासिंग आऊट परेड (शपथ ग्रहण समारोह) संपन्न झाला त्यातील दोन कुंभार बांधवांनी *लातूर येथे ट्रेनिंग पूर्ण केले तर सौरभने सोलापूर येथे ट्रेनिंग पूर्ण करून मुंबई येथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ते रुजू झालेत*. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, सौ माधुरी पाटील,विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल व सर्व सन्मानीय जेष्ठ संचालक हरी वाणी,डॉ.अनिल शिंदे,योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, कल्याण पाटील,विनोद पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट.डॉ.प्रमोद चौधरी,भूगोल विभाग प्रमुख डॉ.कैलास निळे,विभागातील डॉ.किरण गावित,डॉ.महेंद्र महाजन,प्रा.चंद्रशेखर वाडे,प्रा अमित शिरसाठ,प्रा.भूषण पवार,प्रा.प्रितम पावरा, प्रा.चंद्रकांत जाधव तसेच सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.