अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली व श्री वरदविनायक, महड यांचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले दर्शन…
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या पैकी पाली व महड येथील श्री विनायकाचे दर्शन आज दि १४ रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतले. पाली येथे यावेळी डॉ गोऱ्हे यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने महावस्त्र व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.गोऱ्हे यांच्या बहीण जेहलम जोशी, देवस्थान विश्वस्त मंडळाचे प्रमुख श्री जितेंद्र गद्रे, रोहा उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड,
सुधागडचे तहसीलदार श्री उत्तम कुंभार, पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रणाली सूरज शेळके व शिवसेनेचे पदाधिकारी अनुपम दादा कुलकर्णी, शिवसेना रायगड- उपजिल्हाप्रमुख,निखिल शहा – पाली शहर प्रमुख, विनायक जाधव,जिगिशा ओमकार खोडागले,सौ. कल्याणी दपके उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विश्वस्त मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम याची माहिती समजून घेतली व समाधान व्यक्त केले. नगरपंचायतीचे लोकप्रतनिधी यांनी शहराकरिता बसस्थानक मंजूर झाले होते, परंतु अखर्चित निधी परत गेल्याचे सांगितले. याकरता शासनाच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री माधव कुसेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. नगरपंचायतीला व स्थानिक प्रशासनाला भाविकांच्या सोयीकरिता पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या पार्किंग व इतर आवश्यक सुविधा गुगल वर उपलब्ध करून दिल्या तर सर्व अष्टविनायक मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांना त्याचा नक्की फायदा होईल अशी सूचना त्यांनी विश्वस्त मंडळांला दिली. मंदिरात दर्शना करता येणाऱ्या भाविकांच्या सोयी करता आवश्यक सिग्नल यंत्रणा बसवण्याकरता प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर महड येथे श्री वरदविनायकाची व विधिवत पूजा करण्यात आली. महाड येथील वरद विनायक मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या कार्याचे माहिती घेऊन त्यांचे कौतुक डॉ गोऱ्हे यांनी केले.डॉ गोऱ्हे यांच्या निधीतून मंदिर परिसरात हायमास्ट ची तरतूद करण्यात आली होती. सदर काम पूर्ण झाल्याचे समाधान डॉ गोऱ्हे यांनी व्यक्त केला. खालापूर नगरपंचायतीच्या प्रलंबित विकास योजनेमुळे शहरातील तलाव आणि रस्ते रुंदीकरण संदर्भातील कामे विलंब झाल्याचे श्री पांडुरंग पाटील, शिवसेना शहर प्रमुख, खालापूर शहर यांनी माहिती दिली.
पाली आणि महड या दोन्ही ठिकाणच्या विकास कामांचे शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याकरता मा.मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ गोऱ्हे यांनी दोन्ही विश्वस्त मंडळ आणि पदाधिकाऱ्यांना दिले.