• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सत्यशोधक ” निवासस्थानी शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा !.. , कृष्णा गीता नगर कॉलनीतील मुलांनी केले आबासाहेब व तात्यासाहेब यांना वंदन !…

Sep 25, 2024

Loading

“सत्यशोधक ” निवासस्थानी शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा !..

कृष्णा गीता नगर कॉलनीतील मुलांनी केले आबासाहेब व तात्यासाहेब यांना वंदन !…

मुला – मुलींनी साकारली महात्मा फुले व सावित्रीमाईंची वेशभूषा !….

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक तसेच सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांच्या सत्यशोधक निवासस्थानी “सत्यशोधक समाज स्थापना दिवस व शिवराज्याभिषेक दिन ” मोठ्या उत्साहात घरी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कॉलनीतील सर्व बालगोपाल यांच्या हस्ते छत्रपती शिवराय व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याचे चे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले. याप्रसंगी संकेत पाटील याने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व तनिष्का सैनी हिने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारली होती.याप्रसंगी पी डी पाटील यांनी कॉलनीतील सर्व बालगोपालांना शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन याचे महत्त्व सांगितले. आजच्या तरुण पिढीसाठी छत्रपती शिवरायांचे व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य सूर्यासारखे तेज असुन अतिशय प्रेरणादायी आहे.आजच्या पिढीने या महापुरुषांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे हीच खरी आबासाहेब व तात्यासाहेब यांना आदरांजली ठरेल. पाटील यांनी छत्रपती शिवराय व महात्मा फुले यांच्या जीवनातील निवडक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.
याप्रसंगी आराध्या न्हावी, चैताली न्हावी, दिशा कुलट, दृष्टि कुलट, श्रेयस पवार, लावण्या पवार, दादू कुलट,दक्ष मिस्तरी, अदिती कोळी, इशिता कोळी, रिशिता बन्सी, जानवी चौधरी, रोहन पवार, हर्षल पाटील, रोहित सैनी, मनीष सैनी तसेच कॉलनीतील सर्व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *