शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड
1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड

मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी -येथील पंचायत समिती जळगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी व विद्यमान ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.राज्य अध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व राज्य सरचिटणीस दादाराव मुसदवाले बुलढाणा यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या या निवडीबद्दल प्रगती गटाचे रावसाहेब पाटील, सहकार गटाचे उदय पाटील यांचे सह सर्व जिल्हा भरातील शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृन्द यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती विषयी प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले आहे.तसेच नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *