
सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन
सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन
असोदा-सार्वजनिक विद्यालय असोदा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भादली मार्फत किशोरवयीन मुला-मुलींसाठी किशोरी सभा व बाह्य क्षेत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल हे होते.याप्रसंगी डॉ.ताहेर तडवी वैद्यकीय अधिकारी (PHC) भादली,पौर्णिमा पाटील मॅडम जिल्हा कोऑर्डिनेटर (RKSK),ज्योति शिंपी मॅडम समुपदेशक, महेंद्र वानखेडे,दिलीप ठाकूर आरोग्य सहाय्यक भादली, आरोग्य सेविका किरण तट्टे,शारदा चौधरी,आरोग्य सेवक विजय बाविस्कर, रमेश सपकाळे हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्योति शिंपी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले यात मार्गदर्शन करताना किशोर वयातील विद्यार्थी आणि त्यांच्यातील शारीरिक बदल आणि निर्माण होणारे भावबंध यातील समन्वय त्यांनी कसा साधावा हे सांगितले. डॉ. ताहेर तडवी वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आहारात योग्य घटकांचा समावेश करावा असे सांगितले. पोर्णिमा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आहारात फास्ट फूडपेक्षा फळांचा समावेश करा असे सांगितले, योग्य आहारामुळे शरीरात योग्य प्रमाणात हार्मोन तयार होतात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचे शरीर घडताना होतो तसेच त्यांच्या मानसिकतेवर होतो हेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ.मिलिंद बागुल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली चौधरी तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले.