
जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
*जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
भुसावळ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डी आर एम इती पांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . प्रसंगी शाळेचे प्राचार्य आर आर खंडारे, आर जी झांबरे माध्यमिक विद्यालयाचे संचालक प्रमोद शुक्ला, आंतरराष्ट्रीय कोच व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ प्रदीप साखरे, लॉर्ड गणेश विद्यालयाचे संचालक सतीश मोरे, उप प्राचार्य मिलिंद राजे , आदी उपस्थित होते. या स्पर्धेत अहमदाबाद रिजन पुणे रिजन अमरावती रिजन गांधीनगर रिजन अशा चार रिजन चे 288 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यात मुला मुलींच्या14, 17, 19 वर्ष वयोगटात या स्पर्धा संपन्न झाल्या. यात चौदा वर्ष वयोगटात मुलींमध्ये पुणेरी जान प्रथम अमरावती रिजन ने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती रिजनने तर द्वितीय क्रमांक गांधीनगर रीजन ने पटकावले, सतरा वर्षे वयोगटात मुलांन मध्ये व मुलींमध्ये पुणे रीजन प्रथम तर अमरावती रिजन्य द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 19 वर्षे वयोगटात मुलींमध्ये पुणे रिजन ने प्रथम तर अहमदाबादने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तसेच मुलांमध्ये पुणे रीजन प्रथम तर गांधीनगर रीजनने
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर पुणे रीजनने ओव्हर ऑल चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली. निवड समिती सदस्य म्हणून दत्तात्रय महाजन विशाल पाटील दिलीप चौधरी यांनी काम बघितले पंच म्हणून जळगाव जिल्हा खो- खो असोसिएशनचे शेखर पोळ राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनच्या राज्य पंच परीक्षा पास पंचांनी स्पर्धेचे यशस्वी पंचगिरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम द्विवेदी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर आर खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विनिता कालपांडे अभिषेक नाईक क्रीडा शिक्षक व सर्व नवोदय विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.