
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
भुसावळ – भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या. प्रसंगी शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी,विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरला सावकारे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. व शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप साखरे, रेखा सोनवणे, व कार्यक्रमाचे अध्यक्षा सरला सावकारे यांनी लोकमान्य टिळकांचे कार्य विचार विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार अधिकृत करावे म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी केली जाईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाळेचे शिक्षक एन.एच.राठोड यांनी केले..