
संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात”
“संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पिंपळी ता, अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने.. स्वर्गीय आप्पासो रघुनाथ गेंदा महाजन सार्वजनिक वाचनालय पिंपळी तर्फे वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष आणि पिंपळी ग्रामपंचायतीचे सरपंच..
आदरणीय प्रेमराज वामन चव्हाण हे होते. संस्थेचे चेअरमन जनार्दन मांगो शेलकर , व्हॉइस चेअरमन डॉ जीवनलाल भिवसन जाधव, संचालक सुधाकर रघुनाथ महाजन, हे मान्यवर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक.. विकास प्रभाकर शेलकर त्यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली..
वकृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते10वी वर्गातील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या अभ्यासपूर्ण पाठांतराने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उत्कृष्ट सावता महाराजांचे कार्य , जीवन चरित्र, लोकमान्य टिळकांचे कार्य आपल्या शब्दातून विद्यार्थ्यांनी व्यक्त करत मान्यवरांची मने जिंकली.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर जीवनलाल भिवसन जाधव यांनी आपल्या मनोगत.. अध्यात्मिक ज्ञानातून विद्यार्थ्यांना सावता महाराजांचे कार्य, “आपले काम हीच देवपूजा आहे”! प्रत्येकाचं ध्येय निश्चित असले पाहिजे असे प्रतिपादन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास शेलकर सर यांनी आपल्या मनोगतात.. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न, सराव, सहभागाची उत्सुकता स्पष्ट केली.
सावता महाराजांच्या कार्यातून, भक्तीतून ,निघणारा बोध म्हणजेच “कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र”आपले आहे .
कोणतेही काम सुरू करतांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना
“केल्याने होत आहे रे ,आधी केलेच पाहिजे” !
अशी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमराज वामनराव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात.. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना सावता महाराज समजावतांना . हीच आमुची प्रार्थना ,आणि हेच आमचे मागणे,माणसाने माणसाशी माणसा सम वागणे…
या प्रार्थनेचा अर्थ समजावून , आपल्या सुरेल आवाजात गायन करून विद्यार्थ्यांना आनंदित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन..
दिनेश मुरलीधर सावळे यांनी केले ,तर आभार संदीप सोमा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आर के महाजन, आर के सोनवणे , दिनेश चव्हाण , विजेंद्र महाजन तसेच सर्व शिक्षकेतर बंधू यांनी प्रयत्न केले.