पर्यावरण, संस्कार आणि जबाबदारीचा महाउत्सव : साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित श्रमसंस्कार छावणी उत्साहात संपन्न!” , पर्यावरणापासून ऐक्यापर्यंत : श्रमसंस्कार छावणीने दिला समाजभानाचा संदेश!
1 min read

पर्यावरण, संस्कार आणि जबाबदारीचा महाउत्सव : साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित श्रमसंस्कार छावणी उत्साहात संपन्न!” , पर्यावरणापासून ऐक्यापर्यंत : श्रमसंस्कार छावणीने दिला समाजभानाचा संदेश!

Loading

पर्यावरण, संस्कार आणि जबाबदारीचा महाउत्सव : साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित श्रमसंस्कार छावणी उत्साहात संपन्न!”

पर्यावरणापासून ऐक्यापर्यंत : श्रमसंस्कार छावणीने दिला समाजभानाचा संदेश!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसांची ‘पर्यावरण संवर्धन, संगोपन, आपली भूमिका व जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित श्रम संस्कार छावणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या छावणीस नंदुरबार, नवापूर, धडगाव, अहील्यानगर, संभाजीनगर, धुळे, कुसुंबा, भुसावळ, जळगाव व अमळनेर अशा विविध भागांतील ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रेरणादायी अनुभव घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी संविधानातील उद्देशिका वाचून आपली जबाबदारी लक्षात घेतली.
छावणीचे उद्घाटन प्रा. श्याम पवार, प्राचार्य अरविंद सराफ, कवी शरद दादा धनगर, प्रा. सुरेश तात्या, व स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
यावेळी शिंदखेडा येथील वृक्षमित्र योगेश चौधरी यांचा गोपाळ नेवे व सराफ सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छावणी दरम्यान “आपण जेव्हा अधिकार मागतो, त्याला जोडून कर्तव्य येते… स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते…” अशा खेळ, गाणी, गोष्टी, संवादातून विद्यार्थ्यांना सामाजिक भान दिले गेले. दर्शना पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “बलसागर म्हणजे महासत्ता – मात्र प्रेम, ऐक्य, बंधुता आणि विविधतेतूनच ती साकारता येते” हे स्पष्ट केले.
साने गुरुजी व त्यांच्या समकालीन विचारवंतांचे कार्य, मुलांचे कुटुंब, देश, समाजप्रती कर्तव्य, पारंपरिक खेळ, नृत्य, जैवविविधतेची ओळख, निसर्गदर्शन आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व पर्यावरणीय जाणिवा निर्माण करण्यात आल्या.
छावणीचे उत्कृष्ट संयोजन गौरव महाले सर (संयोजक) यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी देसले, आश्विनी वाघमोडे, शुभम पवार, तुषार पाटील, लोकेश वाणी, रेणुका लोहार, विशाखा राजपूत, शिव निकम, प्रणव पाटील, प्रथमेश चौधरी यांनी केले.
याप्रसंगी डॉ. सचिन पाटील, डॉ. लीना, अतुल चौधरी, साक्षी रोहित सोनार, कुसुंबा येथील रणजित शिंदे सर, तसेच साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित अमरावती येथील आकाश देशमुख, शाहू कल्याणकर यांच्यासह एकूण २० मान्यवर उपस्थित होते.
ही छावणी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *