
समाजकार्य विषयात प्रथमच सुवर्ण पदक, प्राचार्य डॉ पी एस व प्रा डॉ कविता पाटील यांचा पुढाकार
समाजकार्य विषयात प्रथमच सुवर्ण पदक,
प्राचार्य डॉ पी एस व प्रा डॉ कविता पाटील यांचा पुढाकार
अमळनेर प्रतिनिधी
डॉ. पी. एस. पाटील व प्रा डॉ कविता पाटील यांनी समाजकार्य विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक जाहीर केले, याबद्दल या दांपत्याचे अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे.
समाजकार्य विषयात ‘गोल्ड मेडल’ नसल्यामुळे विद्यार्थ्यांत तसेच या क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. डॉ. पी. एस. पाटील आणि डॉ.कविता पाटील यांनी पुढाकार घेऊन आपल्या आई आणि वडील दिवंगत शिवराम व शांताबाई यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कुलगुरू प्रोफेसर डॉ व्हि.एल.महेश्वरी यांच्या कडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी प्र कुलगुरू प्रा डॉ एस टी इंगळे, प्रा डॉ आशुतोष पाटील, समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा डॉ जगदीश सोनवणे, समीर नारखेडे, वित्त विभाग प्रमुख रविंद्र पाटील,प्रा डॉ कविता पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. पी. एस. पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासूनच अत्यंत हुशार सर्वांमध्ये रमणारे तसेच गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करणारे म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी रात्री काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले. एम.एस.डब्ल्यूच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर २००१ साली अंमळनेर येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात व्याख्याता पदावर रुजू झाले महाविद्यालयाला सेट उत्तीर्ण उमेदवार मिळाल्याचे समाधान होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष दादा भांडारकर यांनी देखील असा माणूस महाविद्यालयाला मिळतो आहे म्हणून डॉ. पाटील सरांना महाविद्यालयात रुजू करून घेतले.
रूजू झाल्यापासूनच डॉ. पाटील सरांना गरीब, गरजू व हुशार आणि होतकरू, विद्यार्थ्यांबद्दल विशेष आपुलकी होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक व इतर स्वरूपात मदत करीत असतात आहे,
आज विद्यापीठाच्या समाज कार्याच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक समाज कार्य पदव्युत्तर पदवी साठी दिले जाईल.
या पुढाकार घेऊन सुवर्ण पदक जाहीर केले त्याबद्दल संस्थेच संस्थापक अध्यक्ष सुभाष भांडारकर, अध्यक्ष अभिजीत भांडारकर, सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.