
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा – राष्ट्रवादी महिला आघाडीचा माणुसकीचा स्पर्श”
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा – राष्ट्रवादी महिला आघाडीचा माणुसकीचा स्पर्श”
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या वतीने डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशदादा पवार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम पारोळा येथे राबवण्यात आला.
पारोळा तालुका महिला अध्यक्ष सौ. मीनाक्षी भोसले यांच्यासह लताताई राठोड, लताताई पाटील, अभिलाषाताई रोकडे, मोनालीताई पाटील, सोनालीताई देऊळकर यांच्या उपस्थितीत पारोळा येथील परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्या दिवशी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य, व विविध कलागुण सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. परिसरात एक आनंददायी व उत्सवी वातावरण तयार झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन “आनंदाचे क्षण समाजातील वंचितांबरोबर साजरे करावेत” या भावनेतून करण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांतूनच खरी लोकसेवा साध्य होते, असे डॉ. महेशदादा पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, रूपाली ताई चाकणकर, अदिती ताई तटकरे, कल्याणी ताई पाटील, डॉ. संभाजीराजे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमावेळी परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.