अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार”
1 min read

अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार”

Loading

अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र आणि सध्या आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असलेले श्री. संदीपकुमार साळुंखे यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या “सर्वोत्तम सेवा पदक” या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार त्यांना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते २४ जुलै रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयकर दिनाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणार आहे.
देशभरातून केवळ १० अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यात श्री. साळुंखे यांचा समावेश होणे, ही अमळनेरसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
श्री. साळुंखे यांनी केवळ शासकीय सेवेतच नव्हे तर समाजकार्य आणि युवा मार्गदर्शन क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. मारवड विकास मंचाच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध विकासकामे राबवली, तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले.
याशिवाय अमळनेर शहरात त्यांनी अनेकदा प्रेरणादायी व्याख्यानांद्वारे युवकांमध्ये आत्मविश्वास जागवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक तरुणांनी घेतला असून, त्यांची कार्यशैली आजच्या पिढीसाठी आदर्शवत ठरली आहे.
त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना ‘सर्वोत्तम सेवा पदक’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. संदीप साळुंखे यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे अमळनेर नगरीत अभिमानाचा क्षण अनुभवला जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *