
“जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी धरणगावचे डी.एस. पाटील विराजमान”
जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक पदी डी एस पाटील
धरणगाव प्रतिनिधी
. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या धरणगाव तालुक्यातील रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक झाली यात पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा धरणगाव तालुका टीडीएफ चे अध्यक्ष डी एस पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक कामी अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव श्री डी व्ही पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले
त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरुड, जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे नेते यु यू पाटील , महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील पतपेढीचे माजी अध्यक्ष आर एस बाविस्कर, संभाजी पाटील, माध्यमिक शिक्षक सघटनेचे अध्यक्ष एस जी इंगळे सर. पतपेढीच्या समन्वय समितीचे प्रमुख एस के पाटील , धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी के पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एस एस पाटील ग्रंथालय सेलचे मोहन पाटील ,एरंडोल धरणगाव तालुका पतपेढीचे संचालक व्ही टी पाटील, जिल्हा पतपेढीचे मानद सचिव भगतसिंग पाटील उपाध्यक्ष,श्रीमती वैशाली महाजन , खजिनदार संजय निकम , यांच्यासह संचालक मंडळ , पतसंस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.तसेच पी आर हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी, सचिव डॉ मिलिंद डहाळे ,संचालक अजय पगारिया, कांतीलाल शेठ डेडिया, प्राचार्य डॉ उदय जगताप ,माजी प्राचार्य डॉ अरुण वळवी, पर्यवेक्षक डी एच कोळी, ए एस पाटील, संदीप घुगे गणेशसिंह सूर्यवंशी आदींनी स्वागत केले
गेली २५ वर्ष निष्ठेने ,प्रामाणिक पने संघटनेमध्ये विविध पदावर केलेले कामकाज ,तालुका टी डी एफ चे अध्यक्ष म्हणून शिक्षकांसाठी करत असलेल्या कामाचे फळ संघटनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले असल्याच्या भावना डी एस पाटील यांनी व्यक्त केला
फोटो…जळगाव.. जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेत धरणगाव तालुक्यातून बिनविरोध निवड झाल्याबद्दल डी एस पाटील यांचा सत्कार करताना पतपेढीचे व्यवस्थापक श्री महाजन यांच्यासह कर्मचारी वृंद