
समाजातील विकृत प्रवृत्तींचा नाश करण्यास स्वतः खंबीर असणे आवश्यक एडवोकेट ललिता पाटील, श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम संपन्न
समाजातील विकृत प्रवृत्तींचा नाश करण्यास स्वतः खंबीर असणे आवश्यक-
एडवोकेट ललिता पाटील
श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन अंतर्गत मुलींना त्यांच्या स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संजीवनी देवरे मॅडम यांनी केले ,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा सूर्यवंशी मॅडम यांनी भूषविले ,
तसेच कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून अँड सौ ललिता शाम पाटील व खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे या उपस्थित होत्या. त्यांनी मुलींना संरक्षण कसे करावे तसेच मुलींना सध्या स्थितीत घडल्या जाणाऱ्या घटनांच्या द्वारे मुलींनी जागृत असणे आवश्यक आहे. मुलींना बदलापूर घटना, कलकत्ता डॉक्टर हत्याकांड तसेच अनेक उदाहरणे देऊन समाजातील विकृत प्रवृत्तींचा नाश करण्यास स्वतः खंबीर असणे आवश्यक आहे हे पटवून दिले. अशा अनेक गोष्टी मुलींना वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे पटवून दिल्या.कार्यक्रम प्रसंगी फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या सदस्या सौ.लता पाटील यादेखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या .