
प्रताप मध्ये रसायनशास्त्र विभागातंर्गत राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न,
प्रताप मध्ये रसायनशास्त्र विभागातंर्गत राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
————————————————-
प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत RUSA अंतर्गत NTW-IT 2024 या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेतून २०० प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले प्रशिक्षण.
——————————————–
अमळनेर : येथील खा.शि.मंडळ संचलित
प्रताप महाविद्यालयात दिनांक २६ सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSA)अनुदानातून एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा “Instrumentation Techniques (UV-Visible, FTIR, STA)” या विषयावर रसायनशास्त्र विभाग व रसायनशास्त्र शिक्षक संघटना (ACT) क.ब.चौ.उ.म.वि,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
प्रस्तुत प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन,प्रमुख अतिथी प्रा.डॉ.जी.एच सोनवणे, सचिव रसायनशास्त्र शिक्षक संघटना (ACT), अध्यक्ष रसायनशास्त्र अभ्यास मंडळ, कबचौ उमवि, जळगाव, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ नवीनचंद्र शिंपी (रसायनशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ,सांताक्रुज),संसाधन प्रशिक्षण तंत्रज्ञ म्हणून श्री.अजित कुमार नादाल (अनाटक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई) व श्री अनिल विसपुते (श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर अँड रिसर्च लॅबोरेटरी जळगाव) यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, खा.शि.मंडळाचे सहसचिव तथा अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव, रडॉ मुकेश भोळे(रुसा व अंतर्गत गुणवत्ता व अभिवचन कक्ष), महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य पी आर शिरोडे, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा डॉ जी आर गुजराथी आदी सर्व जण उपस्थित होते उपस्थित होते.
सदरच्या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक, प्राध्यापिका , संशोधक विद्यार्थी व विविध महाविद्यालयातील असे एकूण २०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रस्तुत कार्यशाळेसाठी किसान कॉलेज पारोळा, ए सी एस कॉलेज धरणगाव, स्कूल ऑफ केमिकल सायन्स कबचौ उमवी, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव, एमजीएम डीडीएसपी कॉलेज चोपडा, एस पी एम राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, डी डी एस पी कॉलेज एरंडोल, एस डी एन कॉलेज फैजपुर, एमजी व्ही एल व्ही एच कॉलेज पंचवटी नाशिक, तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती, इत्यादी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदवून प्रशिक्षण घेतले.
प्रस्तुत कार्यशाळेची सुरुवात सौ. प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांच्या शारदा सत्वनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.निलेश एस. पवार यांनी केले.
प्राचार्य डॉ.अरुण बी जैन यांनी विभागातील केंद्रीय उपकरण प्रयोग शाळेत असलेल्या विविध अशा उपकरणांची माहिती व तंत्र अवगत करून, आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले साधन कौशल्य विकसित करावे,असे आवाहन केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.गुणवंत एच सोनवणे यांनी *तंत्रज्ञ कौशल्य* ही काळाची गरज आहे व या तंत्रज्ञ कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषया सोबत इतर भौतिक विज्ञान, पदार्थ विज्ञान, औषधोत्पादन अशा विविध क्षेत्रात संधी निर्माण करता येऊ शकते, असे आपले मत मांडले.
प्रा.डॉ.नवीनचंद्र शिंपी यांनी “Materials Characterization and Analysis” या विषयावर आपले व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये प्रात्यक्षिक व साधन प्रशिक्षण तंत्रज्ञ यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो, हे विद्यार्थ्याला समजावून सांगितले. यांनी नॅनो मटेरियल च्या वेगवेगळ्या पातळीवरच्या अनॅलिसिस पद्धती समजावून सांगितले.
यावेळी साधन कौशल्य तंत्रज्ञ म्हणून श्री.अजित कुमार नादार यांनी FTIR Spectrophotometer, श्री.अनिल विसपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी HPLC व UV-Visible स्पेक्टोफोटोमीटर या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर असे प्रशिक्षण दिले. तसेच विभागातील
डॉ.मिलिंद ठाकरे व प्रा.रामदास सुरळकर यांनी त्यांच्यासोबत UV-Visible Spectrophotometer चे मार्गदर्शन केले, Simultaneous Thermal Analyzer (STA) या उपकरणावर डॉ.ए पी मानके, प्रा.डॉ. तुषार रजाळे व प्रा.प्रीतम बोरसे यांनी, Microwave Synthesizer
प्रा.एस एस दिपके यांनी, Ultrasonicator Bath डॉ. विवेक बडगुजर व प्रा.हर्षल सराफ यांनी यावेळी प्रशिक्षण दिले.
अशाप्रकारे प्रशिक्षण कार्यशाळेत एकूण सात उपकरणाचे प्रशिक्षण हे आलेल्या विद्यार्थ्यांना विभागातील प्राध्यापक व सहकारी प्रा विवेक पाटील, प्रा.मितेश भंडारी, प्रा.सौ.प्रियंका देसले, प्रा.सौ प्रियंका पाटील यांच्या मदतीने देण्यात आले.प्रस्तुत कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभाचे सूत्र संचालन डॉ.रवी बाळसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.वैशाली राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपप्राचार्य आणि माजी IQAC Coordinator प्रा. डॉ.जयेश आर गुजराथी सर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळाचे महत्त्व सांगितले. समारोपाचे प्रमुख पाहुणे
श्री.अजित कुमार नादाल, अनाटेक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई हे होते.
प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या -हस्ते काही विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र यावेळी वितरीत करण्यात आले.
समापन कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधून कुमारी कल्याणी चौधरी हीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आपल्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयातील संस्थेचे व प्राचार्यांचे विशेष असे आभार मानले आणि समापन कार्यक्रमात सर्वांचे आभार प्रा.मनीषा मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सर्व देखरेखीचे काम विभागातील सर्व कर्मचारी श्री दिपक बाविस्कर, श्री सुनील बैसाणे,
श्री सुधाकर कोळी, श्री प्रकाश डंबेलकर, श्री कुंदन निकम व जगदीश शिंगाने, श्री विवेक तेले यांनी पाहिले.प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन सचिव प्रा.एस एस दिपके यांनी कार्यशाळेच्या समारोपाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.रवी बाळसकर यांनी अहवाल सादर केले.
प्रस्तुत कार्यशाळेस डॉ.संदेश गुजराथी (कार्याध्यक्ष,खानदेश शिक्षण मंडळ),कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल यांच्यासह संस्थेचे इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे विशेष असे सहकार्य लाभल्यामुळे ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन,उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,प्रा.निलेश पवार, डॉ.मिलिंद ठाकरे,डॉ.रवी बाळसकर,प्रा.एस एस दिपके,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.वैशाली राठोड,प्रा.ए पी मानके,प्रा.रामदास सुरळकर यांच्यासह विभागातील शिक्षकेतर वृंद,विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.