कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न.  कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे -अंकुर आहेर
1 min read

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे -अंकुर आहेर

Loading

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न.

कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे आहे: अंकुर आहेर

ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका आंतरशालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा सावळाराम टर्फ या सुसज्ज मैदानावर अत्यंत पोषक वातावरणात संपन्न झाल्या.याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, तज्ज्ञ व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर, सदस्य कृष्णा माळी, गजानन वाघ हे उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा डाॅजबाॅल असोसिएशनचे कार्यवाह सदाशिव पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत पंचांनी खेळाडूंना न्याय मिळावा या उद्देशाने शिस्तबद्ध पद्धतीने सर्व सामने विनातक्रार घेतले. या आंतर शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेचे क्रीडा प्रमुख म्हणून गुरुनानक इंग्लिश स्कूलच्या क्रीडा शिक्षिका लता पाचपोर यांनी नियोजन केले . याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे यांच्यासह तज्ज्ञ व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर यांनी सांगितले की द अम्युचर खो-खो संघटनेचे सहसचिव कृष्णा माळी यांच्यातील खेळाडू वृत्ती व खेळाविषयीच्या आदर व कल्याण डोंबिवली क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिवृष्टीमुळे स्पर्धा घेण्यास अनेक अडचणी निर्माण होत असताना, सामने कसे घ्यायचे याविषयी कुठेच मार्ग नसताना विद्यापीठ खेळाडू राष्ट्रीय पंच एनआयएस संघटक व सर्व क्रीडाशिक्षक क्रीडा संघटक आणि खेळाडू यांच्या हितासाठी आर्थिक फायद्याच्या विचार न करणारे कृष्णा माळी यांनी स्वतःच्या मैदानावर स्पर्धा आयोजनासाठी कोणताही मोबदला घेता परवानगी दिली व त्यामुळे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर शालेय कबड्डी बॅडमिंटन अशा इतरही स्पर्धा सुरळीत आणि व्यवस्थित होत आहे त्यांच्या या सहकार्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून कृष्णा माळी यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. असे कल्याण डोंबिवली तज्ञ व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर यांनी यावेळी सांगितले. सदस्य कृष्णा माळी, गजानन वाघ हे उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली आंतर शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेतील, मुलांच्या स्पर्धेत १७ वर्षांखालील एकूण ३३ संघ सहभागी झाले व १९ वर्षांखालील एकूण ८ संघ सहभागी झाले होते. तर २७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुलींच्या स्पर्धेत १७ वर्षांखालील एकूण २२ संघ सहभागी झाले व १९ वर्षांखालील एकूण ९ संघ सहभागी झाले होते.
*जिल्हास्तरीय डॉजबॉल निकाल*
17 वर्षांखालील मुलांमध्ये
विद्या निकेतन डोंबिवली, डॉन बॉक्सो स्कूल, कल्याण
द श्रीराम युनिवर्सल, डोंबिवली अनुक्रमे प्रथम,व्दितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
19 वर्षाखालील मुलांमध्ये
लुड्स हायस्कूल कल्याण( प्रथम क्रमांक)
बि. के‌. बिर्ला महाविद्यालय, कल्याण( द्वितीय क्रमांक)
डॉन बॉक्सो स्कूल, कल्याण ( तृतीय क्रमांक) याप्रमाणे विजय संपादन केला आहे.
17 वर्षांखालील मुली* मध्ये
लुर्ड्स हायस्कूल, कल्याण( प्रथम क्रमांक)
शंकरा विद्यालय, डोंबिवली( व्दितीय क्रमांक) डॉन बॉक्सो स्कूल, कल्याण ( तृतीय क्रमांक)

*19 वर्षाखालील मुलींचा स्पर्धेतील* विजयी संघात
गुरुनानक इंग्लिश हायस्कूल प्रथम क्रमांक,
बी के बिर्ला महाविद्यालय, कल्याण व्दितीय क्रमांक,डोंबिवली येथील
मॉडेल कॉलेज ठाकुर्ली तिसऱ्या स्थानी राहिले.
बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक अक्षय टेंबे, मॉडेल कॉलेज डोंबिवलीचे क्रीडा पर्यवेक्षक सुभाष पंजे, लूर्डस् स्कूलचे क्रीडा शिक्षक प्रताप पगार, विद्यानिकेतन डोंबिवली शंकर बारवे, डाॅन बाॅस्को स्कूलच्या रेणूका पिसे, स्वामी विवेकानंद दत्तनगर शाळेचे क्रीडा शिक्षक लजपत जाधव, स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेचे क्रीडा शिक्षक रविंद्र पवार, ठाणे जिल्हा डाॅजबाॅल असोसिएशनचे कार्यवाह सदाशिव पाचपोर सर, डाॅजबाॅल क्रीडा प्रमुख लता पाचपोर यांनी डाॅजबाॅल खेळाच्या आंतर शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सिद्धार्थ विद्यालयाचे खाडे सर यांनी या स्पर्धेला विशेष भेट दिली. अंतिम सामना बी. के. बिर्ला महाविद्यालय व गुरुनानक स्कूल यांच्यामध्ये रंगला होता. या रोमहर्षक सामन्यात गुरुनानक विद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींनी विजय संपादन केला. तर मॉडल कॉलेज डोंबिवलीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. डाॅजबाॅल स्पर्धेचे आयोजन क्रीडा प्रमुख लता पाचपोर यांनी केले याबद्दल सहभागी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शि‌क्षकांनी आभार मानले.

*(द ॲम्युचर खोखो संघटनेचे सहसचिव उत्कृष्ट क्रीडा संघटक श्री कृष्णा माळी यांच्यामुळे कल्याण जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा नियोजनास मोलाचे योगदान लाभत आहे. त्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग तसेच कल्याण डोंबिवली विभागातील क्रीडा संघटक क्रीडा संघटना आणि खेळाडू यांच्यातर्फे श्रीकृष्ण माळी सरांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *