
युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!”
“युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (वाघोदे, ता. अमळनेर) यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिपक पाटील यांचे स्वागत करतांना सांगितले की, “पक्षात येणाऱ्या प्रत्येक नव्या कार्यकर्त्याला योग्य ती जबाबदारी देण्यात येईल. कामाचा ठसा उमठवणाऱ्या प्रत्येकाला पक्षात मानाचे स्थान मिळेल.”
दिपक पाटील हे यापूर्वीपासून साहेबांच्या संपर्कात होते. त्यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करताच त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्याचे आश्वासन शिंदे साहेबांनी दिले.
या प्रसंगी नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा. तुषार सनंसे, भाई, तसेच वाघोदे येथील मान्यवर श्री. जगन्नाथ राजमल पाटील, पंजाबराव पाटील (ढेकू), तुषार पाटील, उमाकांत ठाकूर यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करून पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या ऐतिहासिक प्रवेशामुळे वाघोदे आणि आजूबाजूच्या भागातील राष्ट्रवादी पवार गटाला नवसंजीवनी मिळेल, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.