
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.*
*परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.*
परिवर्धा: शहादा( प्रतिनिधी) परिवर्धा येथील गुरुवर्य जी . एस.पाटील विद्यालयात चि.आरव व चि.गौरव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गणवेश वाटप* दि.23 जुलै वार बुधवार रोजी गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे इ.पाचवीच्या 75 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक देवरे होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ज्योतीबेन प्रशांत पटेल, विवेकानंद पाटील, हंसराज पाटील, सौ.सुधाबेन पाटील सौ.रेखाबेन पाटील, सौ.रिताबेन पटेल, सौ.मीनाबेन पाटील, मुख्याध्यापक जगदीश पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाची सरस्वती पूजन करून करण्यात आली. सर्व मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहादा येथील श्री दत्त हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ.ज्योतीबेन प्रशांत पटेल व डॉ.प्रशांतभाई पटेल यांचे सुपुत्र चि.आरव व शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पाटील सर यांच्या भगिनी सौ.इंदिराताई चौधरी व डॉ.भरतभाई संभु चौधरी रा.प्रकाशा ह.मु.पुणे यांचे सुपुत्र चि.गौरव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिवर्धा येथील पाचवीच्या 75 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वरील दोन्ही मान्यवरांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी डॉ.ज्योतीबेन पटेल यांनी आपल्या मनोगतातून गुरुवर्य जी . एस.पाटील माध्यमिक विद्यालयाचा गौरव करताना येथील प्रशासन, शिस्त, नियोजन, विद्यार्थी उपस्थिती, परिसर स्वच्छता, इ.चा आपल्या मनोगतातून उल्लेख केला.शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते तर ते व्यक्तिमत्व घडवणारे ,संस्कार देणारे असते .हे सांगून आपल्या शिक्षक बंधूंनी विद्यार्थ्यांना सुसंस्काराची जाणीव करून द्यावी असे सांगितले. तसेच शाळेला वेळोवेळी देणगी देणाऱ्या दात्यांचे आभार मानून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख अशोकजी देवरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विजेच्या बल्बचा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन व महानायक अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन आपणही प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती आर.ए.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती जी.डी.चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.