
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने
धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर
धरणगाव — आषाढ महिन्यात ज्या प्रमाणे वारकरींना माऊलीची ओढ असते त्याचं प्रमाणे पाऊले चालती पी. आर. हायस्कूलची वाट!! शतकोत्तरी ज्ञान गंगा पी. आर. हायस्कूलच्या इ. 10 वीच्या 1997 च्या बॅचने मागील दोन वर्षांपासून दहावीत प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर ग्रॅम चांदीचे पदक देऊन सत्कार करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. यावर्षीही शाळेत येवून त्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा 50 ग्रॅम, 30 ग्रॅम, 20 ग्रॅम असे एकूण 100 ग्रॅम चांदीचे पदके प्रशस्ती पत्र, प्रेरणादायी पुस्तक व बुके देवून सत्कार केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे हे होते. प्रमुख अतिथी विशालजी मकवाने साहेब; अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग नाशिक यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांचा सोबत माजी विद्यार्थी सुनील पाटील, प्रा. रविंद्र मराठे, सुशील कोठारी, दीपक केले, बिस्मिला शेख, भटू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, किरण सुतारे, धीरज पवार, गोपाल मराठे, गजानन साठे, विनोद चौधरी, सागर कासार, चंदन पाटील, जलाल शेख, पर्यवेक्षक डी एच कोळी सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या मनोगत व्यक्त करताना विशाल मकवाने यांनी आपल्या शालेय स्मृतींना उजाळा दिला व विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की मनाला स्वच्छ ठेवा. मोबाईलचा वापर व स्क्रीन वेळ मर्यादित राखा. यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा. चिकाटीने अभ्यास करून लक्ष गाठेपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करा.
अध्यक्षीय भाषणात डॉ डहाळे दादा यांनी गुणवंत विद्यार्थिना बक्षिसाची लयलूट करून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचे दातृत्व उत्तम उदाहरण म्हणजे ही 1997 ची बॅच होय. या शाळेत आपण घडलो मी शाळा व शिक्षकांचा ऋण व्यक्त करताना विद्यार्थांचा सत्कार केला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी सरांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी एच कोळी सरांनी केले शाळा व संस्थेकडून विशाल मकवाने व सर्वांचे शाल बुके देवून सत्कार करण्यात आला.
दहावीत प्रथम आलेल्या कु अवंती पिंपळगावकर हिस 50 ग्राम चांदीचे पदक, प्रशस्ती पत्र, पुस्तक व बुके, द्वितीय आलेल्या खुश पवार ह्यास 30 ग्रॅम चांदीचे पदक, प्रशस्ती पत्र, पुस्तक व बुके तर तृतीय आलेल्या किर्ती महाजन हिस 20 ग्रॅम चांदीचे पदक, प्रशस्ती पत्र, पुस्तक व बुके मकवाने साहेब व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच वेदांत सोनिचा, कुणाल कोळी, मानवी चौटे, साक्षी पाटील, वैष्णवी भोई, कांचन शिंदे यांचा करिअर सारथी हे पुस्तक व गुलाब पुष्प देवून सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र धनगर, डॉ बापू शिरसाठ, प्रशांत महाजन, प्रदीप असोदेकर, संदीप घुगे, राजेश खैरे, सुरेखा तावडे, सुरेंद्र सोनार, संजय बेलदार, गोपाळ चौधरी, गोपाळ सोनवणे, नवनीत सपकाळे, प्रमोद पाटील, महेश पाठक, जितू दाभाडे, मिलिंद हिंगोणेकर, योगेश नाईक यांचे अनमोल सहकार्य लाभले.