
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी “लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संदिप वानखेडे यांचेसह सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.