
धरणगावात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक…
धरणगावात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक…
धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर
धरणगांव — विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच शेतकरी पुत्रांना अमानुष मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी धरणगावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधीमंडळात सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते परंतु राज्याचे कृषीमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी विधीमंडळात “ऑनलाईन रमी” खेळण्यात व्यस्त असल्याचे चित्र संबंध महाराष्ट्राने व देशाने बघितलं. याबाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील आणि शेतकरी पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण तसेच त्याच्या कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अजित पवारांनी शेतकऱ्यांना साथ व कृषिमंत्र्यांना लाथ घातली पाहिजे असे मत उबाठा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारने सध्या दडपशाही प्रवृत्तीने वागायला सुरवात केली आहे त्याचेच हे फलित आहे, असे मत रा.काँ.श.प. पक्षाच्या प्रा एन डी पाटील यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशी भावना रा.काँ.श.प. पक्षाच्या कल्पिता पाटील यांनी मांडल्या. जंगली रमी खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिमंत्री गेले पाहिजे असे मत रा.काँ.श.प. पक्षाचे लक्ष्मणराव पाटील यांनी मांडलं. यावेळी विविध प्रकारच्या निषेधाच्या घोषणांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील परिसर दाणाणून निघाला. शेतकरी विरोधी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तसेच सूरज चव्हाण या दोघांवर भादंवि अंतर्गत ऑनलाईन जुगार खेळणे सर्वसामान्यांना मारहाण, धमकावणे या आशयाने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडी धरणगाव शहर व तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, भागवत चौधरी, गजानन महाजन, स्वप्निल परदेशी, सतीश बोरसे, भीमा धनगर, जितेंद्र धनगर, प्रेमराज चौधरी, एन डी पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, उज्वल पाटील, बंटी भोई, लक्ष्मण पाटील, नारायण चौधरी, कल्पिताताई पाटील, हितेंद्र पाटील, कैलास मराठे, गोपाल पाटील, राजू चौधरी, पप्पू सोनार, उमेश महाजन, राजेंद्र माळी, केशव जगताप, मनोज सूर्यवंशी, संजय पटूने, अनंत परिहार, रामचंद्र माळी, नंदलाल महाजन, सलीम मिस्तरी, किरण अग्निहोत्री, परमेश्वर महाजन, खलील खान, विजय पाटील, अमित शिंदे, सागर पारधी, सागर महाले, रमेश महाजन, सोपान महाजन, राजेंद्र चौधरी, रमेश पारधी, गणेश सोनवणे, भाईदास पाटील, भैय्या महाजन, अभिषेक महाजन, औंकार महाजन, विलास पवार, सुनिल चव्हाण, जुनेद बागवान, गणेश सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.