
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !…. माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांच्याकडून पुस्तक पेढीसाठी ११,००० रु. देण्याचे जाहीर !… शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १०० बुट देण्याचे जाहीर !…
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !….
माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांच्याकडून पुस्तक पेढीसाठी ११,००० रु. देण्याचे जाहीर !…
शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १०० बुट देण्याचे जाहीर !…
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवारातर्फे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, शिवसेनेचे गटनेते पप्पूदादा भावे, शहर प्रमुख विलास महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष बाळू जाधव, शिवसैनिक महेंद्र ( बुटा ) पाटील, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, हेमंत चौधरी, वाल्मिक पाटील, तौसिफ पटेल, संजय पवार, संजय चौधरी, सोनु महाजन, अहमदपठान यासह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम आलेल्या सर्व शिवसेना परिवारातील प्रमुख अतिथी व सदस्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील व भानुदास विसावे यांनी शिवसेनेचे सामाजिक कार्य विशद केले. शिवसेना ८० % समाजकारण व २०% राजकारण करणारा पक्ष आहे. दरवर्षी पाटील साहेबांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून धरणगाव तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. यावर्षी देखील माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांनी पुस्तक पेढीसाठी अकरा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना १०० बुट देण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना परिवाराने १५०० वह्या उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी शिवसेना परिवाराचे ऋण व्यक्त केले आमच्या शाळेवर असेच प्रेम असू द्यावे आपली मदत आमच्या विद्यार्थ्यांसाठी मोलाची आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन. कोळी व आभार व्ही.टी. माळी यांनी केले.