
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !…
आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी संप्रदायाचे दैवत, कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे,विज्ञाननिष्ठ संत,समाज प्रबोधकार, संतांचे संत संतश्रेष्ठ शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प हिरालाल महाराज उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते ह भ प हिरालाल महाराज यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवनपट सांगितला. अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे एकमेव संत म्हणजेच संत शिरोमणी सावता महाराज आहेत हे उदाहरणासह स्पष्ट केले. तसेच सावता महाराज आपल्या कामात देव पाहिजे तसं सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी व आपल्या पुस्तकांमध्ये देव पाहून म्हणजेच चांगला अभ्यास करून, चांगले गुण मिळवून शाळेचे व आपल्या पालकांचे नाव उज्वल करावे हीच खरी महाराजांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन हिरालाल महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचे अनमोल विचार सर्व विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार एच डी माळी यांनी मानले.