भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता
1 min read

भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता

Loading

भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे विद्यार्थ्यांसाठी स्व-संरक्षण, सायबर क्राईम व वाहतुकीचे नियम याविषयी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मारवड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री जिभाऊ तुकाराम पाटील व पी.एस.आय. श्री विनोद पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वाहतुकीचे नियम आणि स्व-संरक्षण यावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी जागरूक राहून डिजिटल युगातील धोक्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा यावर विशेष भर देण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव बापूसाहेब व्ही.एस. सोनवणे उपस्थित होते. गावातील अनेक  नागरिक आणि पालक वर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, जबाबदारी आणि सजगता या बाबतीत सकारात्मक संदेश पोहोचविणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *