• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

Oct 1, 2024

Loading

प्रताप महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश
———————————————–
अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय क्रॉस कँट्री व टेबल टेनिस स्पर्धा धनदाई महाविद्यालय आणि महात्मा गांधी महाविद्यालय,चोपडा येथे आयोजन करण्यात आले होते.
यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचे टेबल टेनिस खेळाडू रोहित पाटील (SYBA ), प्राची शिरसाठ (MCOMI),क्रॉस कँट्री खेळाडू अंकित पाटील (FYBA ), धनश्री पाटील (FYBSC ) हे विजयी होऊन त्यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या यशाबद्दल खा.शि.मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील,जितेंद्र देशमुख, विश्वस्थ सौ.वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा,डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,खा. शि. मंडळ सचिव व आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण बी.जैन, सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,
उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, करिअर कौन्सलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील,प्रा.व्ही बी मांटे, डॉ.योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक डॉ.एस.बी नेरकर ,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष प्रमुख डॉ. मुकेश भोळे,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.अमृत अग्रवाल, कुलसचिव राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,श्री.प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *