• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या घटस्थापना

Oct 3, 2024

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या घटस्थापना

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात गुरूवार, ३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी दहा वाजेच्या सुमारास विधिवतरित्या घटस्थापना करण्यात आली. शहरातील सुपरिचित एस. के. ज्वेलर्सचे संचालक सचिन सूर्यकांत भामरे सपत्नीक या महापूजेचे मानकरी होते.
श्री मंगळग्रह मंदिरात शैलपुत्रीच्या रुपात सजविलेल्या श्री भूमीमातेसमोर घटांची उभारणी करण्यात आली. तसेच संपूर्ण मंदिर तसेच परिसर आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र चैतन्य, भक्तिमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
मुख्य मानकरी भामरे दाम्पत्याच्या शुभहस्ते मंत्रोपचारात विधिवतरित्या घटांची स्थापनेवेळी गणपतीपूजन, दुर्गापूजनासह महापूजा पार पडली. देवीची महाआरती होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *