कंजरभाट समाजासाठी स्मशानभुमीकरीता जागा उपलब्ध करा
नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
गेल्या 40 वर्षा पासून अमळनेर कंजर भाट समाजाला अंतविधी साठी हक्काची स्मशानभूमी नाही , म्हणून कंजरभाट समाजाला हक्काची स्मशानभूमी मिळावी या साठी कंजर भाट समाज युवा शक्ती बहु. उ.संस्थे मार्फत आज रोजी नगरपालिका आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
समस्त कंजरभाट समाज अमळनेर यांचे तर्फे कंजरभाट समाज युबाशक्ती बहुउददेशिय संस्था अमळनेर. महोदय, आम्ही समस्त कंजरभाट समाज नागरीक अमळनेर या व्दारे आपणांस विनंती अर्ज सादर करतो कि, अमळनेर शहरात समस्त कंजरभाट समाजाची एकुण लोकसंख्या अंदाजे 1 000 पेक्षा जास्त असुन समस्त कंजरभाट समाज कंजर वाडा बहादरपुर रोड ब ताडेपुरा या भागात वास्तव्यास आहोत. सामाजिक चाली रिती व पिंढयापिढया सुरु असलेल्या परंपरे नुसार समाजातील मृत व्यक्तिस पुरण्याची प्रथा प्रचलित आहे. सदर सामाजिक प्रथेची जपणुक करणे गरजेचे आहे. तरी सदय स्थितीत समाजातील एखादया व्यक्ती मयत झाल्यास सदर व्यक्तीस खाटेश्वर मंदिर शेजारील गट क्रमांक 989 मध्ये दफन विधो होवून थडग्याची निर्मीती करणेत येते सदर भुखंड हा खाजगी मालकोचा असून त्यात दफन विधो करणेकामी वेळोवेळी विरोध होत असतो. तरी संपुर्ण समाजाच्या भावना लक्षात घेता तसेच सार्माजक पंरपंरेची जपणुक करणेकामी नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद मालकोची अथवा इतर सरकार मालकोची जागा समस्त कंजरभाट समाजाच्या स्मशानभुमी या प्रयोजनासाठी मिळणे आवश्यक आहे. करीता खाटेश्वर मंदिर शेजारील गट क्रमांक 988 हा गट एकुण क्षेफ 0.96 हे.आर चौ.मी हा गट सरकार मालकोचा असून सदर जागा हि संपुर्णपणे पडीत आहे. तरी उक्त नमुद गट क्रमांक 988 सरकार मालकोची जागा समस्त कंजरभाट समाजाच्या स्मशानभुमी या सामाजिक प्रयोजनाकरीता मिळणेस विनंती आहे. (आपल्या सुलभ संदर्भासाठी म.जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांना पारीत केलेल्या आदेशाची सादर करोत आहोत)
असे कंजरभाट समाज युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सरजू पप्पू अभंगे ,उपाध्यक्ष राहुल भास्कर -सचिव टोनी बागडे ,खजीनदार सुरज कंजरभाट ,
सल्लागार गोकुळ बागडे, सदस्य
नितीन बागडे ,राकेश अभंगे ,दिनेश बागडे आकाश तामचिकर,योगेश बाटगे विकास टिळंगे उपस्थित होते.