• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

Oct 8, 2024

Loading

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन झाले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी ते हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे रवाना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed