महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने मागील वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची” स्थापना करण्यात आली होती, त्या संघटनेच्या आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती पहिला वर्धापन दिन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता,
विद्यार्थी शिक्षक- शिक्षकेतर आणि शाळांचे हितासाठी संघटना सदैव प्रयत्न करणार प्रयत्न करणार आहे, आज पर्यंत केलेल्या कामाचा आढावा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिला, सर्वांना सोबत घेऊन संघटनेचा विस्तार करावा, असे प्रतिपादन करण्यात आले.* *दहा हजारापेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतरांचे कामे दीड वर्षाच्या कारकिर्दीत मला करता आली, मोठ्या प्रमाणामध्ये शाळांना निधी उपलब्ध करून “ई लर्निंग चे साहित्य व सोलर पॅनल” वाटप करण्यात आले, तसेच यापुढेही शाळांच्या विकासासाठी निधीचा वापर केला जाईल*अनुदानाचा टप्पा वाढ नुकताच मिळाला असून, जुनी पेन्शन मिळावी याकरता सतत प्रयत्न करत राहणार, आणि इतर जे मुद्दे सुटलेले नाहीत, ते विद्यमंडळामध्ये मांडून, व सतत शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वांना न्याय देण्याचे काम करणार असे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले व सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या, अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा वाढ करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जीवाचे रान केले म्हणून अनेक अंशतः शाळेतील शिक्षकांनी आमदार म्हात्रे सरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे सल्लागार चंद्रकांत दादा पवार, बाळासाहेब सोनजे, राज्य संपर्क प्रमूख विष्णू विशे, खारीक सर, राज्य सचिव श्री अरुण भोईर, किरपान सर, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव प्रवीण लोंढे, दिगंबर बेंडाले, ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी दळवी, वसंत जोहरे, पालघर जिल्हा अध्यक्ष महेश कुडू, विजय राणे, पंजाब बागडे, विकास वाघमारे, डाकी सर, ठाकरे सर, धर्मेंद्र शुक्ला, भाई पष्टे सर, अनिल पाटील, अनंत किनगे, सुधीर देशमुख, मगर सर, मनोहर पाटकर, सतीश ठानगे, परदेशी सर, भामरे सर, कुरले सर, संतोष कांबरी, दिलीप म्हसे, अर्जुन उगलमुगले सर, आणि अनेक तालुक्याचे पाधाधिकरी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठया प्रमाणात उपस्थीत होते.*
दसऱ्याचा सण असल्यामुळे लांबच्या जिल्ह्यातील लोकांना न बोलवता, जवळच्याच तालुक्यातील लोकांना बोलून पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला, पुढील वर्षी दुसरा वर्धापन दिन भव्य दिव्य साजरा करण्याचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.
अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संपर्क प्रमुख विष्णू विशे यांनी दिली आहे.