वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला,
१४१ प्रवाशांचे वाचवले प्राण
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
१४० प्रवाशांचा जीव वाचवणारे मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे.
त्रिची एअरपोर्ट ३६००० फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, पुण्याच्या लेकीने वाचवला १४० प्रवाशांचा जीव, पाहा ‘ती’ कोण?
त्रिचीहून शाजाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १४० प्रवांशाचा जीव धोक्यात होता. मात्र, पुण्याच्या लेकीने आपल्या कल्पक बुद्धीने प्रवाशांचा जीव वाचवला आहे.
सुरभी टिळेकर को पायलट मैत्रेयी शितोळे पुणे या खर्या हिरो ठरल्या आहेत.खर्या देवदुत म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता तमिलनाडूच्या त्रिची एअरपोर्टवर नेहमीप्रमाणे गजबज सुरू होती. प्रवाशांची ये जा सुरू असताना अचानक गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली अन् थोड्याच वेळात बातमी आली ती फ्लाइट IX ६१३ ची… तब्बल ३६ हजार फूट उंचीवर विमानात बिघाड झाला आणि एक दोन नव्हे तर १४० प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हायड्रॉलिक सिस्टिम अचानक निकामी झाल्याने वैमानिकांची तारेवरची कसरत सुरू होती. विमानाची सेफ लँडिंग करणं गरजेचं होतं. त्याचवेळी वैमानिकांनी तत्परता दाखवली अन् अशक्य अशी कामगिरी करून दाखवली.
हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याची बातमी आल्यावर विमानतळावर गोंधळ उडाला होता. अधिकाऱ्यांनी विमानतळावर एमरजन्सी लावली. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर २० हून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आल्या. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. परंतू अधिकाऱ्यांना आपल्या वैमानिकांवर विश्वास होता. एअर इंडिया फ्लाइटचे पायलट क्रोम रिफादली, फहमी झैनाल आणि सह-वैमानिक मैत्रेयी शितोळे यांच्यासाठी ही खरी कसोटी होती. विमानाला सुरक्षित खाली उतवरण्यासाठी दोघांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि अखेर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरित्या खाली उतरवल गेलं. मात्र, तुम्हाला माहितीये का? १४० वैमानिकांचा जीव वाचवणारी सह-वैमानिक मैत्रियी श्रीकृष्ण शितोळे ही पुण्याची होती.
मैत्रेयी शितोळेने न्यूझीलंडमधील मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे प्रशिक्षण घेतलं होतं. त्यावेळी तिने न्यूझीलंडमध्येच व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर मैत्रेयीने भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि नोव्हेंबर २०१९ पासून ग्राउंड इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केलं एअर नेव्हिगेशन तांत्रिक उड्डाणाच्या इथिकल या गोष्टीत मैत्रियीणे प्राविण्य मिळवलं होत.मैत्रियी शितोळे यांनी वैमानिक होण्याआधी फिजिक्स मध्ये डिग्री मिळवली होती.
दरम्यान, मी एक कर्तव्यदक्ष आणि जबाबदार व्यावसायिक आहे, असं मैत्रेयी शितोळे म्हणतात. तसेच दबावाखाली चांगलं काम करू शकते, असं देखील मैत्रेयी शितोळे यांचे म्हणणं होतं. अशातच आता याची प्रचिती तिला स्वत: देखील झाली असेल. १४० प्रवाशांचा जीव तळहातावर असताना आपल्या चाणाक्ष्य बुद्धीने पुण्याच्या लेकीने अशक्य अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे आता पुणेकर अभिमानाने मान गर्वाने उंचावतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे .आपण जी कामगिरी केली आहे, त्याबद्दल तमाम देशवासीयांकडून आपले मनापासून धन्यवाद आणि आभार अशीच उंच उंच भरारी घ्या.अश्या अशा शब्दात कौतुक करण्यात येत आहेत आणि शुभेच्छा देण्यात आहेत.