• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बोपदेव घाटातील पोलीस चौकीला दिली भेट आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा

Oct 17, 2024

Loading

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बोपदेव घाटातील पोलीस चौकीला दिली भेट

आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा

पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. तसेच भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीसांना सूचना दिल्या. यावेळी सुषमा हिंगमीरे पोलीस , सर्जेराव चव्हाण उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे असून याबाबत ऊर्जा विभाग, महापालिके आणि पोलीस विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील चौकीत असणाऱ्या पोलिसांकरिता मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविणे यांकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेले दहा पोलिसांचे गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *