
मराठी लाईव्ह न्युज चे “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर; ६ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा
मराठी लाईव्ह न्युज चे “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर;
६ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा
अमळनेर प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता साने गुरुजी ग्रंथालय समोर जुना टाऊन हॉल, अमळनेर येथे आयोजित केला जाणार आहे.
समारंभात संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, पत्रकारिता, कृषी आणि क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले तर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपयुक्त आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे मा. कपिल पवार, सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. मा. सुनील नंदवाडकर, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव, अमळनेर येथील शाळेचे अध्यक्ष मा. विलासराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा.ना. आंधळे, मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे उपस्थित राहणार आहेत.
“कर्तुत्व गौरव पुरस्कार २०२४” मानकरी:
1.मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर – क्षेत्र: अध्यात्मिक
2. **विजय पाटील, स्वादिष्ट नमकीन, अमळनेर** – क्षेत्र: युवा उद्योजक
3. **प्रा. सुभाष सुकलाल पाटील, शिरूड, ता. अमळनेर** – क्षेत्र: कृषी
4. **डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे, अमळनेर जिल्हा जळगाव** – क्षेत्र: वैद्यकीय
5. **सौ. सुषमा वासुदेव देसले पाटील, दहिवद, ता. अमळनेर** – क्षेत्र: सामाजिक व राजकीय
6. **श्री शरद तुकाराम धनगर, करणखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव** – क्षेत्र: साहित्य
7. **श्री आर.आर. सोनवणे, बेटावद, ता. शिंदखेडा** – क्षेत्र: सेवानिवृत्त क्रीडा व विज्ञान शिक्षक
8. **श्री सुनील प्रभाकर वाघ, जी. एस. हायस्कूल, अमळनेर** – क्षेत्र: क्रीडा
9. **सागर सुखदेव कोळी, पाडळसे, ता. अमळनेर** – क्षेत्र: युवा प्रेरणा पुरस्कार
10)सौ छाया संदिप पाटील
पोलीस पाटील
पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगावक्षेत्र-सामाजिक
या कार्यक्रमात सर्व पुरस्कार्थी बंधू-भगिनींना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व बुके देऊन सन्मानित केले जाईल.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सर्व वाचक, जाहिरातदार, शिक्षक बंधू-भगिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार यांनी उपस्थिती देऊन मराठी लाईव्ह न्युज पोर्टलच्या वर्धापन दिनाला उपस्थिती द्यावी असे मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर महाजन यांनी आवाहन केले आहे..
या गौरव सोहळ्यात भाग घेण्याची संधी गमवू नका; संघर्ष आणि यशाचा हा क्षण प्रेरणादायी ठरणार आहे!