“अ . भा . माळी . महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा नंदुरबार जिल्हा दौरा संपन्न ”
आज दि . १ डिसें २०र४ रोजी अ भा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा दौरा होता . यात नंदुरबार येथे महात्मा फुले फाऊंडेशन व नंदुरबार जिल्हा माळी समाज वतीने सर्व शाखीय माळी समाज वधुवर परीचय मेळावा घेण्यात आला ‘ या वेळी उदघाटक मा ना विजयकुमार गावीत आणि मा . चंद्रकांत रघुवेशी व विलासराव पाटील यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले . यावेळी वधुवर यांचा परिचय करून देण्यात आला ‘ यावेळी समाज बांधव उपस्थित होते .
या मेळाव्यात श्री विलासराव पाटील म्हणाले की वधुवर परीचय मेळावा ही काळाची गरज आहे . समाजाने वधुवर मेळ्या०यात एकाच ठिकाणी सर्व शाखीय मुले मुली भेटून पसंती करण्यात यावी . या मेळाव्याला जिल्हयातील अनेक समाजबांधव उपस्थित होतें .
यानंतर नंदुरबार जिल्हयातील तळोदा येथे श्री माळी समाज मंगल कार्यालयात अ भा माळी महासंघ युवक आघाडी ची बैठक झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री विलासराव पाटील होते . प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल तात्या व काशिनाथ माळी ‘ रोहन माळी हजर होते . व युवकांना मार्गदर्शन केले .