प्रशासकीय सभेत पारोळा तालुका बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार.
पारोळा:
येथील तहसीलदार कार्यालय पारोळा येथे आज दिनांक २६ डिसेंबर २४ रोजी आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या सभेप्रसंगी निर्धार करण्यात आला.
प्रारंभी मनीष कुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या एरंडोल येथील सभेत ठरल्याप्रमाणे आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते.
उल्हास देवरे, तहसीलदार पारोळा यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून बैठकीचे नियोजन केले. संपूर्ण पारोळा तालुका बालविवाह मुक्त घडविण्यासाठी मार्गदर्शन केले.
सभेसाठी अनिल पाटील, नायब तहसीलदार पारोळा, संजय मोरे , बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी पारोळा, डाॅ.चंद्रकांत सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, विश्वास पाटील, गटशिक्षणाधिकारी पारोळा, यामिनी जटे, प्रशासकीय अधिकारी नगर परिषद पारोळा.,राजु बागुल,बाल संरक्षण अधिकारी,
जीवन मोरे, पारोळा तालुका समन्वयक, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, संदेश संदानशीव, विवेक पाटील, आधार संस्था प्रतिनिधी, विठ्ठल वारकर आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीला पारोळा तालुक्यातील पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.
संजय मोरे,बालविकास प्रकल्प अधिकारी तथा गटविकास अधिकारी पारोळा यांनी बालविवाह मुक्त भारत घडविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचं असल्याचे स्पष्टीकरण दिले. प्रत्येकाने आपला गाव बालविवाह मुक्त घडविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.
आधार संस्था प्रकल्प समन्वयक जीवन मोरे यांनी उपस्थितांना बालविवाह मुक्त भारत घडविण्यासाठी शपथ घेतली. सभेदरम्यान बालविवाह मुक्त प्रकल्पाच्या कार्यासाठीचे नियोजन करण्यात आले.
बालविवाह मुक्त भारताच्या मार्गदर्शक सभेसाठी ग्रामीण पातळीवर काम करताना गावातील प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत विषय पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.