समाजकार्य महाविद्यालय अमळनेर रा.से.यो स्वयंसेवक सागर कोळी विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित….
अमळनेर प्रतिनिधी
युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय, मुंबई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा 2023-24. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यापीठ संलग्न क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामास प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा येथोचित गौरव करणाऱ्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय आव्हान 2024-25 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिबिरात मध्ये पं.ज.ने.समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर रा.से.यो एककाचा स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांनी सहभाग घेतल्याबद्दल व उत्कृष्ट कामगिरी बजावली व या निमित्ताने दि.26 डिसेंबर 2024 रोजी डॉ.सचिन नांद्रे सर (संचालक रासेयो,कबचौ,उमवि जळगाव) यांच्या हस्ते सागर सुकदेव कोळी यांना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या वेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व सदरचे कार्य असंच सुरू ठेवावे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सागर ला दिल्या. या वेळी उपस्थित प्रमुख अतिथी मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री,युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार) ,अध्यक्ष मा.प्रा.व्ही.एल.माहेश्वरी (कुलगुरू कबचौ उमवि, जळगाव ),मा.प्रा.एस. टी.इगंळे(प्र -कुलगुरू,कबचौ उमवि,जळगाव), मा.राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्य.प.सदस्य कबचौ उमवि जळगाव), डॉ.विनोद पाटील (कुलसचिव कबचौ उमवि जळगाव) ,डॉ.सचिन नांद्रे (संचालक रासेयो,कबचौ उमवि,जळगाव) तसेच विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते…