इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२४ दि. २८ डिसेंबर रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. फाळके यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. इंदिरा करंडक २०२४ चा प्रथम मानकरी ठरला अभय कृष्णकांत आळशी . प्रसिद्ध लेखक व व्याख्याते प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे, प्रा. सतीश देशपांडे, प्रा.विश्वस गुरव ,डाॅ.गणेश खामगळ
संचालक, मिटकाॅन फोरम ,पुणेयांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विविध विषयांवर वैचारिक मंथन करत स्पर्धकांनी रंगत आणली.पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद कला, क्रीडा व सांस्कृतिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत खाबिया तसेच मा. आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी असे कार्यक्रम देशांतील नागरिकांच्या वैचारिक जाणीवा समृद्ध करत असतात ,ते वेळोवेळी आयोजित केले पाहिजेत असे सांगत स्पर्धक व आयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिके पुढीलप्रमाणे
*प्रथम क्रमांक* – *अभय कृष्णकांत आळशी*
रु .१५००० + करंडक + प्रशस्तीपत्र.
*द्वितीय क्रमांक – रोहन जोतीराम कवडे*
रु. ११०००+ करंडक+प्रशस्तीपत्र.
*तृतीय क्रमांक – यश रवींद्र पाटील*
रु. ७०००+ करंडक+ प्रशस्तीपत्र.
*उत्तेजनार्थ*
१)श्रुती बोरस्ते – रु . ३०००+ गौरवचिन्ह+ प्रशस्तीपत्र.
२) तेजस दिनकर पाटील – रु . ३०००+ गौरवचिन्ह+प्रशस्तीपत्र
३) वेदांत परशराम पुंड -रु.३०००+गौरवचिन्ह+प्रशस्तीपत्र.
यावेळी इंदिरा सोशल फ़ाउंडेशन चे अध्यक्ष कृष्णा काजळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव प्रविण चव्हाण यांनी केले . आभार कार्याध्यक्ष कौस्तुभ पाटील यांनी मानले. यावेळी फ़ाउंडेशन चे सदस्य व स्पर्धकांची भाषणे ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोते उपस्थित होते.