*राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड.*
*संजय काळे यांची महाराष्ट्र आट्यापाट्या महिला संघाच्या प्रशिक्षक पदी निवड.*
ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व ३४ वी महिला सिनियर महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धा खडवली, कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून ठाणे जिल्ह्यातील पुरुष गटातून एजाज तडवी, चारुदत्त काळे यांची आणि महिला गटातून वैभवी चव्हाण, अनुराधा मोरे यांची आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ३ ते ५ जानेवारी दरम्यान, शेगाव , बुलढाणा येथे होणाऱ्या ३७ वी पुरुष ३३ वी महिला सिनियर राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन सचिव, मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच संजय काळे यांची महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वांचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे तसेच सर्व पदाधिकऱ्यांनी विशेष कौतुक केले. अशी माहिती
ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोशियन चे सचिव संजय काळे यांनी दिली आहे.