• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्स – 2025 या विषयावरील एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे सिपना महाविद्यालय चिखलदरा येथे भव्यआयोजन

Jan 4, 2025

Loading

रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्स – 2025 या विषयावरील एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे सिपना महाविद्यालय चिखलदरा येथे भव्यआयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सिपना शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथे 01 फेब्रुवारी, 2025 ला मॅथेमॅटिक्स विभागाच्या वतीने
रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्स -2025 (एन सी आर टी एम ए एस एस 2025) व मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एवं प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत या एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.या चर्चासत्राचा उद्देश संपूर्ण भारतातून मॅथेमॅटिसियन एकत्रीत यावे. आणि आपल्या ठिकाणी असलेल्या मॅथेमॅटिक विषया संदर्भात ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी अभ्यासक संशोधकांना जनरल रिलिटीविटी, थेरीज ऑफ ग्रॅव्हिटेशन, प्युअर मॅथेमॅटिक्स, अपलाइड मॅथेमॅटिक्स, मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, एस्ट्रो फिजिक्स अँड स्पेस सायन्स, मटेरियल सायन्स ( फिजिक्स) ऍस्ट्रॉनॉमी, इंटर डिसिप्लिनरी रिसर्च इन मॅथेमॅटिक्स या विविध विषयांवर आधारित आपले शोध निबंध एवं गणितीय मॉडेल्स सादर केले जाणार आहेत. तसेच रेपुटेड जर्नल मध्ये पब्लिश होणार आहेत. त्यासाठी पाचशे रुपये विद्यार्थ्यांसाठी तर सहभागी अभ्यासकांसाठी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आकारण्यात आली आहे. तीनशे रुपये पेपर पब्लिकेशन फी द्यावी लागेल. संशोधकांचा पेपर इंटरनॅशनल इंडेक्सड
जरनल मध्ये प्रकाशित करण्यात येईल. त्यासाठी A-4साईच्या पेपर वर न्यू रोमन फंड साइज 12 या लिपीत abstract
12 जानेवारी 2025 पर्यंत तर
पूर्ण पेपर 25 जानेवारी 2025 पर्यंत खालील ईमेल वर पाठवावेत. ncrtmass25@gmail.com किंवा nsbascc@gmail.com हे ईमेल देण्यात येत आहे. रजिस्ट्रेशन फी करीता खालील सुविधा उपलब्ध आहे,
323402010007103 या बँक खाते नंबर वर पाठवावी. IFSC UBIN0532347 युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखलदरा.
काही अडचण असल्यास 7020019934 यावर संपर्क साधावा. या एक दिवशी चर्चासत्राला सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, *माजी राज्यमंत्री माननीय श्री जगदीशभाऊ गुप्ता*, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंदजी बरहाते,सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉ. रवींद्रजी कडूसर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी प्र-कुलगुरू (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)
डॉ. राजेशजी जयपूरकर*यांची
उपस्थिती लाभणारा आहे. त्यासाठी महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख,
तथा पी.एम. उषा चे संयोजक
डॉ. गोपाल ढोकणे, मॅथेमॅटिक विभाग प्रमुख व संयोजक डॉ. व्ही. आर. पाटील, सहसंयोजक मॅथेमॅटिक विभागाचे प्रा. एन. एस. बायस्कर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. तरी गणित विषयाच्या अभ्यासकांनी संशोकांनी, विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय चर्चासत्रात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून
हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करावे. असे आवहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *