
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव २०२५ मध्ये *थंडरव्हील प्रतियोगीतेतील महाराष्ट्रातील एकमेव विजेता प्रसाद शिंपी यांच्या भव्य सत्कार.*
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव २०२५ मध्ये
*थंडरव्हील प्रतियोगीतेतील महाराष्ट्रातील एकमेव विजेता प्रसाद शिंपी यांच्या भव्य सत्कार.*
कल्याण
(प्रतिनिधी)
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण तर्फे दिनांक 31 मार्च 2025 रोजी झालेल्या ग्लोबल खानदेश महोत्सव अशा भव्य दिव्य मोठ्या कार्यक्रमात आपल्या शिंपी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व व मानव सेवा हीच ईश्वर सेवा गृप चे प्रमुख आर.एस. पी.कमांडर श्री मनिलाल शिंपी यांचे सुपुत्र चिरंजीव प्रसाद मनिलाल शिंपी याला थम्सअप कंपनीच्या थंडर व्हील 2025 मध्ये घेण्यात आलेल्या थंडर व्हील प्रतियोगितेमध्ये महाराष्ट्रातून एकमेव विजेता ठरलेला आहे.Thumps up कंपनीने त्याला हिरो कंपनीची तीन लाख रुपये किमतीची 440cc ची मोटार बाईक बक्षीस म्हणून दिली. त्याच्या या यशाबद्दल ग्लोबल खानदेश महोत्सवात चि.प्रसाद शिंपी याचा ग्लोबल खान्देश महोत्सव चे स्वागत अध्यक्ष श्री संजय अप्पा बोरगावकर व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे खजिनदार श्री ए जी आप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रसादचे आईवडील श्री मनिलाल शिंपी व सौ.संगीताताई शिंपी यांचे सुद्धा सत्कार करण्यात आला. प्रसादचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर पाटील, समाज कल्याण न्यासचे महाराष्ट्र राज्य संस्थापक डॉ.सोन्याभाऊ पाटील, चंद्रानंद कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले, पोलिस पाटील संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे, उद्योजक समाजसेवक आणि उत्कृष्ट व्याख्याते डॉ.किशोर अढळकर, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर, कल्याण शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री.गणेश सावळे, सचिव श्री.अरविंद शिंपी, खजिनदार श्री.प्रविण भंडारकर,मनोहर सोनवणे, तसेच अखिल भारतीय शिंपी समाज संगीत वृंद कमिटीचे उपप्रमुख श्री.रवींद्र नेरपगार,रोटी डे ग्रुप चे नीतील चंदेइया यांचा कडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.