• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण!

Apr 15, 2025

Loading

अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या सौजन्याने करिअर कौंसेलिंग सेंटर व सुनेट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिण्याचा अद्ययावत संगणक कोर्स फेब्रुवारी-मार्च मध्ये ऑफलाइन संपन्न झाले.
प्रस्तुत कोर्स मध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सक्रीयपणे आपला सहभाग नोंदविला होता.या कोर्ससाठी प्रवेश निःशुल्क होते.प्रस्तुत कोर्से मध्ये कॅनव्हाचे उपयोग कसे करावे,गामा अकाउंट, एम एस वर्ड, एक्सेल,सायटेशन,संदर्भ,येणा-या काळातील आव्हाने अशा विविध स्वरूपाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
प्रस्तुत कोर्सचा समारोप व बक्षीस वितरण 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात घेण्यात आले. सदरच्या समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, सुनेट कॉम्पुटरचे प्रमुख संजयजी पालकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाचे प्रास्ताविक करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी,प्रताप शेठजी,साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
तदनंतर स्वागत गीत एफ वाय ची विद्यार्थिनी रमा चव्हाण यांनी म्हटले यानंतर अफ्रिन खान-पठाण,जागृती पाटील,विशाल पाटील,रमा चव्हाण यांनी आपले कोर्सचे अनुभव मनोगतातून सादर केले.
सुनेट कॉम्पुटरचे प्रमुख संजय पालकर यांनी ppt द्वारे विविध स्वरूपाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तदनंतर डॉ.मुकेश भोळे यांनी सुद्धा IT Cell संबंधी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी सध्या विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, त्यासाठी संस्था पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासीत केले.
प्रस्तुत समारंभाचे आभार अफ्रिन पठाण यांनी मानले.
*यशस्वी बक्षीस पात्र विद्यार्थी*
तन्वी सुर्यवंशी,अफ्रिन पठाण
गौरी चौधरी,विना भामरे,सोपान पाटील
,करुणा काळे,तनिष्का मोरे,प्रथम पाटील
,सुमित भालेराव,.मनीषा शिरसाठ ,स्नेहल शिसोदे,जिया शहा,चेतन चौधरी,जागृती पाटील,मेघना माळी,रमा चव्हाण,लीना शिरसाठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *