*संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी २४ एप्रिल ला नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र*
जळगाव :- शासनाच्या वतीने लवकरच *नवीन शैक्षणिक धोरण* राज्यातील शाळांसाठी लागू केले जाणार आहे. या शैक्षणिक धोरणाची माहिती शिक्षण क्षेत्रातील *संस्था चालक व मुख्याध्यापक* यांना होणेसाठी *जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ* यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या *मुख्याध्यापकांसाठी व संस्थाचालकांसाठी* चर्चा सत्राचे आयोजन दिनांक *२४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता ‘डॉ. केतकी सभागृह डॉ उल्हास पाटील मेडीकल कॉलेज*, जळगाव खुर्द, (भुसावळ रोड) येथे आयोजित करण्यात येत आहे.
या चर्चासत्रासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे *प्राचार्य मा. डॉ. अनिल झोपे*, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे *प्राचार्य ए. आर्.राणे*, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष *प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे* महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष *ज्ञानेश्वर कानडे,* महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे मा. उपाध्यक्ष *महेंद्र गणफुले* हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य *मा. निळकंठराव गायकवाड* भुषविणार असून *प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, रजिस्टार प्रमोद भिरुड, मुख्याध्यापक महामंडळाचे मा. अध्यक्ष जे. के. पाटील* उपस्थित राहाणार आहेत. या चर्चासत्रासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थाचालक संघटनेचे *अध्यक्ष जयवंत पाटील, कार्याध्यक्षा रोहिणी खेवलकर-खडसे, उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, प्रा. जीवनचंद खिंवसरा, सरचिटणिस संजय सोमाणी, चिटणिस शकील पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे* तसेच मुख्याध्यापक संघाचे *अध्यक्ष गोपाल पाटील, सेक्रेटरी बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा साधना लोखंडे, ललित चौधरी, सहचिटणीस डी.बी., बोरसे, आर्.ए*. पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य संस्थाचालक संघ व मुख्याध्यापक संघ यांनी केले आहे.