• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचा विश्वस्त पदी परिवर्धे येथील गुलालभाई पटेल यांची नियुक्ती*

Apr 22, 2025

Loading

*कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचा विश्वस्त पदी परिवर्धे येथील गुलालभाई पटेल यांची नियुक्ती*

 

शहादा( प्रतिनिधी)कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या विभागस्तरीय बैठकीत परिवर्धा ता. शहादा येथील वारकरी सांप्रदायातील जेष्ठ व्यक्तीमत्व,नंदुरबार जिल्ह्यातील निष्ठावंत, समाजसेवक दानशूर,मनमिळावू,सर्वसामान्यांना मदत उपलब्ध करून देणारे, तसेच परिसरात धार्मिक उपक्रम, भागवत सप्ताह,सनातन हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तत्पर असलेले आदरणीय ह.भ.प‌. गुलालभाई पटेल यांची कान्हादेश वारकरी संप्रदाय मंडळाचा विश्वस्थ पदी नियुक्ती करण्यात आली. गुलालभाई पाटील हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे माध्यमातून वारकरी सांप्रदायातील साधु संताच्या विचाराचा प्रचार प्रसार प्रवचन, किर्तनाच्या माध्यमातून तळागाळातील जनसामान्यां पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, अध्यात्मिक, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. श्री ह.भ.प. गुलालभाई पटेल यांचा अनेक वर्षांपासून यात सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या सक्रियतेचे सहकार्य मंडळाला कायमच मिळत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची विश्वस्त पदी स्तुत्य निवड करण्यात आली. या बैठकिस मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प‌. सुधाकर बापू भोकरे, कार्याध्यक्ष डॉ. बी.एल. पाटील, उपाध्यक्ष ह.भ.प‌. हिरामण आप्पा गवळी, सचिव सुनिलभाऊ वाघ, जेष्ठ विश्वस्त ह.भ.प‌. सतिषनाना बच्छाव, सर्वश्री ह.भ.प. चंद्रकांत आबा गिरासे, निंबादादा पाटील, डॉ. देसले बोराडी, धनराज बापू देसले, विनोद ‌पवार, योगिराज पाटील, प्रविण माळी, शिरपूर तालुका अध्यक्ष श्री विश्वासराव पाटील, तळोदा तालुका अध्यक्ष श्री. नवनितभाई पाटील, शहादा तालुका अध्यक्ष श्री. गजानन भाऊ गरुड, विश्वस्त ह.भ.प. प्रकाश विभांडीक, कैलासभाऊ पवार, शिंदखेडा तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, धुळे तालुका अध्यक्ष शरद पाटील आदींसह धुळे, साक्री, पारोळा, नंदुरबार, शहादा, तळोदा, शिरपूर, शिंदखेडा येथील पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गुलालभाई यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.तसेच कान्हादेश वारकरी सेवा मंडळ पदाधिकारी ह भ प श्री चंदू बाबा ससदेकर यांच्या पुतण्याच्या हळदीच्या कार्यक्रमा प्रसंगी कानादेश वारकरी सेवा मंडळ शहादा तळोदा शिरपूर नंदुरबार शिंदखेडा सर्व विश्वस्त सदस्य तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली..तसेच ह भ प श्री गुलाल भाई परिवर्धा कर यांना कानादेश वारकरी सेवा मंडळ विश्वस्त पद दिल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट चे विभागीय कमांडर डॉ मणिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,चंद्रानंद कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,रोटरी क्लब डोंबिवली मिडटाऊन चे मा.सचिव व प्रख्यात मोटीव्हेशनल स्पीकर डॉ.किशोर अढळकर, पोलिस पाटील संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ ठाकरे,
स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्याभाऊ काशीनाथ पाटील यांच्याकडून नवनिर्वाचित कान्हादेश वारकरी संप्रदाय मंडळाचे विश्वस्थ ह.भ प.श्री.गुलालभाई पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed