• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिवस साजरा*

Apr 22, 2025

Loading

*फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिवस साजरा*

अमळनेर प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात औषधी गुणधर्मयुक्त व पर्यायाने मानवी स्वास्थ्य व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा आवळा, रुद्राक्ष, इन्सुलिन, लिंबु, कण्हेर व इतर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.अनिल बोरसे प्रा.रविन्द्र माळी, प्रा.प्रितम पाटील, प्रा.सतिश ब्राम्हणे, प्रा.प्रफूल्ल चव्हाण,प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा.सुनिता चोपडे,प्रा.वर्षा पाटील प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा.वैशाली कुलकर्णी, प्रा.गीतांजली पाटील,प्रा.प्रगती पाटील, प्रा.हर्षदा पवार,प्रा.मानसी उपासनी तसेच अनिल महाजन, कविता शिंपी, महेश सोनजे, ज्ञानेश्वर चौधरी, यश शिंपी, किशोर बुलके व कैलास कड यांनी महाविद्यालय परिसर सुशोभित केला.

पदवी, पदविका अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed