अमळनेरमधील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या महत्वाकांक्षी कायापालटासाठी सुरु असलेल्या २.४० कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
आमदार अनिल पाटील यांनी या विकास कामांचा अमळनेरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात खासदार स्मिता वाघ यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर पुरातन काळापासून भक्तांचे आदरस्थळ असल्याचे सांगितले आणि नवीन विकासामुळे अमळनेरमधील धार्मिक पर्यटनाला मोठा गतीमान वाढ होईल, असे सांगत या कामांना यशस्वीतेची शुभेच्छा दिली.
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री सुभाष चौधरी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत आणि सत्कार ट्रस्टच्या वतीने केला. तसेच संस्थेचे ट्रस्टी संजय पाटील, संजय शुक्ल, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, भिकन वाडीले, कृ.उ.बा. संचालक हिरालाल पाटील, हेमंत पवार, भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, मराठा समाज कार्यालयाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, खासदार शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी अशी इतर प्रमुख मान्यवरं उपस्थित होती.
भूमिपूजनार्थ कार्यक्रमात श्री वर्णेश्वर मंदिर परिसरातील चोपडा रोड ते मंदिरासमोरील रस्त्याचे भूमिपूजन, भक्तनिवास असलेल्या समाज भवनाचे भूमिपूजन, परिसरातील तलावाचे सुशोभिकरण आणि मंदिरवॉल व कंपाऊंडचे नारळफोडणी, कुदळमार्फत भूमिपूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हेमंत भांडारकर, राजू फाफोरेकर, देविदास देसले, सुनिल पाटील, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, महेश कोठवडे, डॉ. संजय शहा, गणेश पाटील, राजेंद्रभोला टेलर, भरत परदेशी, विजय पवार, रामराव पवार, सुरेश पाटील, सौ. पायल पाटील, अनिल कासार यांसह शेकडो शिवभक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वितेसाठी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी रामराव पवार, नारायण बडगुजर, राजू देसले, भावेश चौधरी, सतीश धनगर आदी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम चौधरी यांनी पार पडले.
या विकासकामांमुळे श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विकास होऊन, परिसरातील लोकांसाठी तसेच भाविकांसाठी एक समृद्ध व आकर्षक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.