• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कैलास बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा शिवाजी विद्या मंदिर तांबेपुरा येथे संपन्न

Apr 24, 2025
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0063,0.0000; brp_del_sen:0.1300,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 117.06625;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 40;

Loading

कैलास बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा शिवाजी विद्या मंदिर तांबेपुरा येथे संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
कैलास मधुकर बोरसे यांचा, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा (ता. अमळनेर) येथे नुकत्याच भावनिक आणि विशेष सेवापूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन कैलास पाटील होते. प्रमुख अतिथींमध्ये बी. एस. पाटील, जी. बी. पाटील, जी. बी. बोरसे, मुख्याध्यापिका वैजयंती पाटील मँडम, शगुप्ता मँडम, संदीप पवार, सत्कारमुर्ती कैलास बोरसे, नंदा बोरसे मँडम, मुख्याध्यापक संजीव पाटील, रणजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्तीनंतर नवीन जीवनात कुटुंबासाठी आणि समाजसेवेसाठी वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बी. एस. पाटील यांनी विशेषतः कैलास बोरसे सरांच्या 1994 पासून सात्री गावात रूजू होऊन 31 वर्षे शहरातील शाळेसाठी अथक परिश्रम करण्याचे कौतुक केले. त्यांच्या योगदानासाठी शाळेकडून तसेच अमळनेर तालुक्यातील इतर माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी सन्मान केला.
कार्यक्रमात बी. एस. पाटील, सुनिल काटे, धनंजय कापडणीस, रणजित शिंदे आणि बडगुजर सर यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक प्रफुल्ल बोरसे, धनंजय कापडणीस, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील काटे, महेश निकम, के. डी. चौधरी, राहूल शिरसाट, ललिता भामरे मँडम, सुलोचना पाटील आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस. के. पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक कैलास बोरसे सर यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांचे आभार मानले. त्यांनी उपस्थितांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. अमळनेर तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षकांनी त्यांचा सहपत्निक सत्कार केला..

हा सोहळा शिक्षक कैलास बोरसे यांच्या समर्पित सेवेला वंदन ठरला असून त्यांच्या पुढील जीवनासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *